|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » सदाभाऊ खोतांचा फैसला 21 जुलैला

सदाभाऊ खोतांचा फैसला 21 जुलैला 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज होणाऱया चौकशी समितीसमोल सदाभाऊ हजर राहणार नाहीत. त्यामुळे 21 जुलैला होणाऱया बैठकीत सदाभऊंचा फैसला होणार आहे. सदाभाऊ खोतांना स्वाभिमानीतून घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने सदाभाऊंना नोटीस पाठवून, पुण्यातील शासकीय विश्रामगृहात 4 जुलै रोजी हजर राहण्याची सूचना दिली होती. स्वाभिमानीच्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱयांनी नाराजी दर्शवली, त्यांचे वर्तन संघटनेच्या हिताला धोका पोहोचवणारा आहे, असा आक्षेप पदाधिकाऱयांनी या बैठकीत घेतला. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेण्यासाठी चार सदस्ययि समितीची स्थापना करण्यात आली होती.

 

Related posts: