|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » आता मायक्रोसॉफ्टकडून रोजगार कपातीचे संकेत

आता मायक्रोसॉफ्टकडून रोजगार कपातीचे संकेत 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने रोजगार कपात करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड कम्प्युटिंग प्रणालीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे, यामुळे कर्मचाऱयांची संख्या घटविण्यात येईल असे सांगण्यात आले.

मायक्रोसॉफ्ट कंपनी आता क्लाऊड सर्व्हिसेसवर अधिक लक्ष देणार आहे आणि यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाला आपल्या व्यवसाय रचनेत बदल करावा लागणार आहे. यामुळे विक्री विभागातील हजारो कर्मचाऱयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. 31 मार्चपर्यंत कंपनीमध्ये 1,21,567 कर्मचारी कार्यरत होते. मायक्रोसॉफ्ट आपल्या ग्राहक आणि भागिदारांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हे नवीन बदल करत आहे.

कंपनीकडून कर्मचाऱयांना ई-मेल पाठविण्यात आला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. या ई मेलनुसार, कंपनी आपल्या व्यवसायाला दोन हिश्श्यात विभागणार आहे. व्यावसायिक विक्री क्षेत्रात मोठय़ा ग्राहकांसाठी एक विभाग असून दुसरा लहान आणि मध्यम आकाराच्या ग्राहकांवर लक्ष देणार आहे. कर्मचाऱयांना सहा क्षेत्रानुसार विभागण्यात येईल. यामध्ये उत्पादन, आर्थिक सेवा, रिटेल, आरोग्य, शिक्षण आणि सरकारी सेवा असे विभाग असतील. कर्मचाऱयांना मॉडर्न वर्कप्लेस, बिझनेस ऍप्लिकेशन, ऍप्स, इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात सॉफ्टवेअर विक्रीवर भर द्यावा लागेल.

Related posts: