|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » देशाचा विकास दर असमाधानकारक

देशाचा विकास दर असमाधानकारक 

देशाचा विकास दर असमाधानकारक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.1 टक्के होता. प्रगत देशांच्या तुलनेत यात वाढ होण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहे. देशाचा विकास दर हा समाधानकारक नाही, असे बजाज ऑटोचे प्रमुख राहुल बजाज यांनी म्हटले आहे.

प्रमुख क्षेत्रात गेल्या चार ते पाच वर्षात गुंतवणूक कमी होत असून खासगी क्षेत्राकडून नवीन गुंतवणूक करण्यात येत नाही. अनुत्पादित कर्जाची वाढती संख्या पाहता बँकांकडून कर्ज देण्यास मर्यादा येत आहेत. देशाचा विकास वाढीस निश्चलनीकरण हे प्रमुख कारण आहे. 2016-17 पासून देशाचा विकास वेगाने होईल अशी आपली अपेक्षा होता. मागील मागील वर्षांतील कामगिरी पाहता संतुष्टजनक नाही, असे कंपनीच्या 2016-17 च्या वार्षिक अहवालात समभागधारकांना म्हटले आहे.

गेल्या वर्षात भारताचा विकासदर 7.1 टक्के होता. अनेक विकसित देश आणि चीनसह उभरत्या अर्थव्यवस्थांत ही विकास दर सर्वोत्तम होता. मात्र 2016 या आर्थिक वर्षाच्या 7.9 टक्के विकासदरापेक्षा हा कमी आहे. देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी 7.5 टक्के ते 8 टक्क्यांदरम्यान विकासदर असणे आवश्यक आहे. यासाठी रोजगारनिर्मिती मोठय़ा प्रमाणात होणे, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे अस्तित्त्व आणि गरिबी दर कमी होणे आवश्यक आहे.

सरकारकडून पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक होणे आवश्यक आहे. अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती होण्यास वेळ लागतो. कोणत्याही खासगी कंपनीकडून योग्य प्रकारे गुंतवणूक झाली नाही. 27 सरकारी बँकांजवळ 6,47,759 कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या दोन वर्षांत यात 140 टक्क्यांनी वृद्धी झाल्याचे त्यांनी म्हटले.