|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » कतारकडून नैसर्गिक वायू उत्पादन वाढीचा निर्णय

कतारकडून नैसर्गिक वायू उत्पादन वाढीचा निर्णय 

दोहा

नैसर्गिक वायूच्या उत्पादनात पुढील काही वर्षांत 30 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कतारकडून सांगण्यात आले. कतारच्या शेजारच्या देशांकडून राजनैतिक संबंध तोडण्यात आल्याने मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. 2024 पर्यंत देशातील नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढवित 100 दशलक्ष टनवर नेण्याचा निर्णय घेतल्याचे कतार पेट्रोलियमचे प्रमुख साद शरिदा अल काबी यांनी सांगितले.

नवीन प्रकल्पांमुळे कतारचे नैसर्गिक वायू क्षेत्रातील स्थान मजबूत होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे एलएनजी क्षेत्रात दीर्घकाळासाठी कतारचे नेतृत्त्व राहील. सध्या नैसर्गिक वायूचे 77 दशलक्ष टनने प्रतिवर्षी उत्पादन घेण्यात आले. या निर्णयामुळे प्रतिदिनी 6 दशलक्ष पिंपाने अधिक उत्पादन घेण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले. जागतिक पातळीवर एलएनजी उत्पादनात कतार सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

गेल्या महिन्यात सौदी आणि चार अन्य देशांनी कतारबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले होते. याकडे आर्थिक संकट म्हणूनही पाहण्यात येते. देशाची आर्थिक स्थिती कमजोर होता नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Related posts: