|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » 4जी इंटरनेट वेगात ‘जिओ’च अव्वल

4जी इंटरनेट वेगात ‘जिओ’च अव्वल 

नवी दिल्ली

 : 4जी इंटरनेट वेगाबाबत रिलायन्स जिओने आपले वर्चस्व कायम ठेवले. जून महिन्यात जिओचा इंटरनेट डाऊनलोड वेग सरासरी 18.8 एमबीपीएस होता असे ट्रायने म्हटले. मेमध्ये हा सरासरी वेग 19.12 एमबीपीएस होता. अन्य 4जी कंपन्यांच्या तुलनेत हा वेग सर्वाधिक आहे. सात महिन्यापासून इंटरनेट वेगात जिओ सर्वप्रथम आहे. व्होडाफोन या यादीत दुसऱया स्थानी असून सरासरी डाऊनलोड वेग 12.29 एमबीपीएस, तिसऱया स्थानी आयडिया असून वेग 11.68 एमबीपीएस आणि एअरटेलचा वेग 8.23 एमबीपीएस आहे.

 ट्रायने ही माहिती आपल्या मायस्पीड या ऍपच्या माध्यमातून गोळा केली आहे. अन्य 4जी सेवा देणाऱया कंपनीच्या वेग प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. 3जी वेगाबाबत व्होडाफोन सर्वोच्च स्थानी असून जूनमध्ये डाऊनलोड वेग 5.65 एमबीपीएस होता. यानंतर आयडिया 3.59 एमबीपीएस, एअरटेल 3.37 एमबीपीएस, एअरसेल 2.36 एमबीपीएस आणि सरकारी मालकीच्या बीएसएनएलचा सरासरी डाऊनलोड वेग 1.59 एमबीपीएस आहे.

Related posts: