|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण

आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 12, एनएसईचा निफ्टी 2 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

आशियाई भांडवली बाजारात तेजीने घसरण झाल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरत बंद झाले. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9650 आणि सेन्सेक्स 31353 पर्यंत पोहोचले होते.

बीएसईचा सेन्सेक्स 12 अंशाने घसरत 31,210 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 2 अंशाने कमजोर होत 9,613 वर स्थिरावला.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागातही दबाव दिसून आला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 50 अंशाने घसरत 14,759 वर बंद झाला. बीएसईचा हा निर्देशांक 14890 पर्यंत पोहोचला होता. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक घसरत 15,567 वर बंद झाला. दिवसात हा निर्देशांक 15,671 पर्यंत पोहोचला होता.

पीएसयू बँक, एफएमसीजी, औषध, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागात सर्वात जास्त घसरण झाली. बँक निफ्टी 0.25 टक्क्यांनी घसरत 23,214 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.5 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.9 टक्के आणि औषध निर्देशांक 1 टक्क्यांनी कमजोर झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स इन्डस्ट्रीज, बीपीसीएल, एचडीएफसी, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि अदानी पोर्ट्स 3-0.9 टक्क्यांनी मजबूत झोल. इंडियाबुल्स हाऊसिंग, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटो, ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, आयटीसी आणि टाटा मोटर्स डीव्हीआर 2.25-1.3 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात व्हिडिओकॉन, नाल्को, टोरेन्ट पॉवर, एल ऍण्ड टी फायनान्स आणि श्रीराम सिटी 4.8-2.9 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात वेंकिज, लिबर्टी शूज, रिलॅक्सो फूटवियर, हबटाऊन आणि त्रिवेणी टर्बाइन 19.25-11.8 टक्क्यांनी मजबूत झाले.

मिडकॅप समभागात रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा कम्युनिकेशन्स, ब्लू डार्ट, अदानी पॉवर आणि इंडियन हॉटेल्स 4.4-2.7 टक्क्यांनी कमजोर झाले. स्मॉलकॅप समभागात करिअर पाँईन्ट, रेलिगेयर एन्टरप्रायजेस, ओमकार स्पेशियालिटी, विमल ऑईल्स आणि जस्ट डायल 7.5-4.9 टक्क्यांनी घसरले.

 

Related posts: