|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात आज पेट्रोल – डिझेल खरेदी बंद

पुण्यात आज पेट्रोल – डिझेल खरेदी बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आज पेट्रोल – डिझेल खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुकारलेल्या या आंदोलनात द पुना पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन सदस्य सहभागी होती. मात्र पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन आंदोलनात सहभागी होणार नाही.

मागण्या मान्य न झाल्यास 12 जुलैपासून बेमुदत खरेदी आणि विक्री बंदचा इशाराही या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. परिणामी 12 जुलैला पुण्यात पेट्रोल पंप बंद राहतील. दररोज बदलणाऱया भावांमुळे पेट्रोलपंप चालकांचे नुकसान टाळण्यासाठी एआयपीडीए कायदेशीर लढा देत आहे. केंद्रीय मंत्र्यांनीदेखील तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांचे नुकसान टाळण्यासाठी दराचे एक सूत्र ठरवावे, अशा सुचना दिल्या आहेत.

 

Related posts: