|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » बजाज अलायन्सची ‘फ्यूचर वेल्थ’ योजना

बजाज अलायन्सची ‘फ्यूचर वेल्थ’ योजना 

ऑनलाईन टीम /मुंबई :

बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्सतर्फे बजाज अलायन्स लाईफ फ्युचर वेल्थ गेन योजना सुरू करण्यात आली आहे. भविष्यातील वित्तीय ध्येय प्राप्त करण्यासाठी भांडवली बाजारात गुंतवणूक केल्याने याद्वारे जास्तीत जास्त परतावा मिळू शकणार आहे.

याबाबत बजाज अलायन्झचे एमडी आणि सीईओ तरुण चुघ यांनी माहिती दिली. फ्युचर वेल्थ गेन ही एक नॉन पार्टिसिपेटिंग यूएलआयपी योजना आहे. यामध्ये नियमित आणि मर्यादित देयकांसाठी प्रमुख देयकांचे पर्याय उपलब्ध असतात. या योजनेद्वारे व्यक्तीला फंड व्हॅल्यू मिळते. त्याशिवाय प्रमुख फंड व्हॅल्यूही दिली जाते. याचबरोबर गॅरेंटेड लॉयलटी ऍडिशनसह पूर्तीच्या तारखेला उपलब्ध असलेली व्हॅल्यू प्राप्त होते. त्यामुळे जास्तीत जास्त परतावा मिळायला मदत होते. 25 वर्षांच्या पॉलिसीच्या कालावधीत एक वर्षाच्या प्रीमियवर 30 टक्के दिले जातात, दर पाच वर्षांनी ही देयके दिली जातात, हा कालावधी पॉलिसी सुरू झाल्यावर 10 वर्षांनंतर सुरू होतो.

 

Related posts: