|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » राज्य सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल ; अजित पवारांची टीका

राज्य सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल ; अजित पवारांची टीका 

पुणे / प्रतिनिधी :

सरपंचांची निवड लोकांमधून करण्याचा राज्य सरकारचा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे. या माध्यमातून सरकारची हुकूमशाहीकडेच वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी सरकारवर सोडले.

राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.

याबाबत पवार म्हणाले, सरपंचांची निवड लोकांमधून करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय विकासाला मारक आहे. थेट नगराध्यक्ष निवड पद्धतीमुळे अनेक घोळ झाले आहेत. अनेक भागांत नगराध्यक्ष वेगळय़ा पक्षाचा, तर कार्यकारिणीत वेगळय़ा पक्षातील लोक निवडून आल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. या निर्णयानेही तेच होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आधीच मोठा गोंधळ होतो. सरपंच लोकांतून निवडण्याच्या निर्णयाने तो आणखी वाढेल. लोकशाहीसाठी हा निर्णय घातक असून, यातून हुकूमशाही वृत्ती वाढण्याचा धोका संभवतो. उद्या मुख्यमंत्री व पंतप्रधान लोकांतून निवडला, तर चालेल का, असा सवालही त्यांनी केला.

 

Related posts: