|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » सेवा क्षेत्राचा निर्देशांक आठ महिन्याच्या उच्चांकावर

सेवा क्षेत्राचा निर्देशांक आठ महिन्याच्या उच्चांकावर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सेवा क्षेत्राचा निर्देशांक (पीएमआय) आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपन्यांना नवीन ऑडर्स मिळाल्याने जूनमध्ये हा 53.1 वर पोहोचला. या क्षेत्राने चांगली कामगिरी केली असून पुढेही हे प्रदर्शन चांगले राहण्याची शक्यता आहे. निक्केई सेवा पीएमआय मे महिन्यात 52.2 वर होता.

हा अहवाल तयार करणाऱया आयएचसी मार्किटच्या अर्थशास्त्रज्ञा पॉलियाना डी लिमा यांच्या मते, बाजारात चांगले वातावरण असल्याने या क्षेत्रातील कामगिरी वधारत नवीन व्यवसाय वाढला आहे. 2017 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये जी घसरण झाली होती, त्यानंतर आता विकास दर पुन्हा रुळावर येत आहे. कंपन्यांना नवीन ऑडर्स मिळाल्याने हा निर्देशांक आठ महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. काही कंपन्यांकडून नवीन रोजगारनिर्मिती करण्यात आली आहे.

जून महिन्यातील आपल्या द्विमासिक पतधोरणात आरबीआयकडून रेपोदरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. महागाई पूर्णतः नियंत्रणात येण्यासाठी आरबीआयकडून पावले उचलण्यात येत आहे, असे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले होते.

जीएसटी लागू करण्यात आल्याने उत्पादन घेणाऱया आणि सेवा पुरवठा करणाऱयांमध्ये साशंकता आहे. काही कंपन्यांच्या मते मागणीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. विश्वासार्ह पातळीत घट होत आहे. यामुळे मजबूत आणि संपन्न अर्थव्यवस्था होण्याचे आव्हान आहे, असे लिमा यांनी म्हटले.

Related posts: