|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » स्थावर मालमत्ता क्षेत्रात घसरण

स्थावर मालमत्ता क्षेत्रात घसरण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्थावर मालमत्ता क्षेत्राला नोटाबंदीचा अजूनही परिणाम सहन करावा लागत आहेत. यानंतर लागू करण्यात आलेल्या रेरा कायद्याने या क्षेत्राची कंबर मोडली आहे. या क्षेत्रातील मागणीत 41 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून गेल्या 7 वर्षातील ही सर्वात नीचांकी पातळी आहे. वर्षाच्या आधारे विक्रीमध्ये 11 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या पाच वर्षातील पहिल्या सहामाहीतील सर्वात कमी आकडेवारी आहे. इंडिया रिअल इस्टेट नावाने नाईट प्रँक इंडियाच्या या सहामाही अहवालात ही माहिती देण्यात आली.

जानेवारी ते जून या सहामाहीच्या कालावधीत देशातील प्रमुख आठ शहरांतील निवासिका आणि कार्यालयाच्या विक्रीचा सखोलपणे अहवाल सादर करण्यात आला. 2017 च्या पहिल्या सहामाहीत ऑफिस ट्रान्झॅक्शनमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या सहामाहीत साधारण पाच लाख निवासिकांची खरेदी करण्यात आली. ही सर्वात कमी विक्री आहे. यामुळे बाजाराचा आकार लहान झाला आहे.

प्रमुख आठ शहरांत ताबा घेण्यासाठी तयार असणाऱया निवासिकांची संख्या जास्त आहे.

Related posts: