|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जातो माघारी पंढरीनाथा…

जातो माघारी पंढरीनाथा… 

पंढरपूर / प्रतिनिधी

जातो माघारी पंढरीनाथा / तुझे दर्शन झाले आता

    सावळया विठठलांचे दर्शन करून आज लाखों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. त्यामुळे दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन आणि खाजगी वाहनामुळे पंढरीतून बाहेर पडणारे रस्ते गर्दीनु फ्gढलून गेले होते.

  मंगळवारचा एकादशीचा उपवास आज व्दादशीदिवशी गोडाधोडाने सोडून भाविक पंढरीमधून परतीच्या प्रवासाला पहाटेपासूनच लागले होते. पंढरपूरातून परतताना भाविकांना चंद्रभागेचे स्नान आणि नामदेव पायरीचे दर्शन आणि विठठलांचे शिखर दर्शन घेउन पंढरीचा निरोप घेत होता.

   मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासूनच अनेक वारकरी भक्तांना पंढरीचा निरोप घेण्याची आस लागली होती. त्यानुसार अनेक भाविकांनी पंढरीतून निरोप रात्री बारानंतरच एकादशीचा उपवास सोडून घेतला. पंढरीतून भाविक परतत असताना पहाटेपासून चंद्रभागा बसस्थानक , मुख्यबसस्थानक , रेल्वे स्टेशन जवळ असलेले कर्नाटक डेपोच्या बसचे स्थानक आदि ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. साधारणपणे सकाळी दहाच्या सुमारास मोठया प्रमाणावरील शहरातील भाविकांची गर्दी कमी झाली होती. यामधेच आज व्दादशी दिवशी आलेला बुधवार देखिल लक्षात घेता. अनपेक्षितपणे पंढरपूर शहर मोकळे होण्यास सुरूवात झाली होती.

  विठठलांची पदस्पर्श दर्शन रांग आज अगदी पत्राशेडच्याही पुढे पर्यत जाउन पोहोचली होती. त्यामुळे विठठलदर्शनासाठी साधारणपणे 14 तासांचा कालावधी लागत होता. तर मुखदर्शन अवघ्या एका तासांच्या आतमधे देखिल होताना दिसून आले.

    पंढरीमधून परतीच्या मार्गावर जाण्यासाठी दिवसभर रेल्वे स्टेशनवर मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली. रेल्वे प्रशासनाकडून वारीसाठी लातूर , मिरज , कुर्डुवाडी , खामगाव , अमरावती आदि ठिकाणसाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे सदरच्या रेल्वे गाडयामधून परतीच्या प्रवासाकंिरंता जाण्यासाठी देखिल मोठया प्रमाणावर गर्दी होती.

  वारीसाठी शहरामधे मोठया प्रमाणावर खाजगी वाहनाने भाविक दाखल झाले होते. सदरच्या भाविकांनी देखिल मोठया प्रमाणावर पंढरपूरातून दुपारनंतर व्दादशीचा प्रसाद घेउन निरोप घेतला होता. त्यामुळे पंढरपुर शहरातून बाहेर पडणारे रस्ते अर्थात लिक रोड , कराड रोड , इसबावी , सांगोला चौक , तीन रस्ता आदि भागांमधे मोठया प्रमाणावर वाहतुकींची कोंडी झाली होती. मात्र पोलीस आणि खाजगी वाहनामधून प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरलेले भाविक यांच्या समन्वयांने तात्काळ रस्ते वाहनाने मुक्त होत होते.

   एकादशीची संध्याकाळ आणि व्दादशीदिवशी जरी 80 टक्के भाविकांनी पंढरपूरातून निरोप घेतला असला तरी शिल्लक असणा-या भाविकांनी आज मोठया प्रमाणावर चंद्रभागा वाळवंट , विष्णुपद , गोपाळपूर , कैकाडी महाराज मठ , संत तनपुरे महाराज मठ , संत गजानन महाराज मठ आदि मठांना भेटी देत मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. सदरचे शिल्लक राहणारे भाविक पौर्णिमेचा महाव्दार काला करून परतीच्या मार्गावर लागणार आहे.

सद्य स्थितीला पंढरपूर शहरात सुमारे दीड लाखांच्या आसपास भाविक अजूनही शिल्लक आहे. नित्यनेमाने वारीला येणारे पंरपरागत वारकरी हे एकादशी करून पौर्णिमेच्या गोपाळकाला आणि महाव्दार काल्यापर्यत पंढरपूर येथे असतात. सदरचा काला घेउनच जुने जाणते वारकरी भकत पंढरीचा निरोप घेत असतात. त्यामुळे सद्य †िस्थतीला असणारी गर्दी ही पौर्णिमेपर्यत राहणार आहे.

  व्दादशीमुळे बासुंदीला मागणी ….

   एकादशीचा संपूर्ण दिवसभर असणारा उपवास सोडण्यासाठी व्दादशीला वारक-यांचे त्यांच्या मठांमधून अथवा दिंडयामधून गोडाचे जेवण असते. याचसाठी आज पंढरपूर आणि मंगळवेढयाची प्रसिध्द असणा-या बासुंदीला मोठया प्रमाणावर मागणी असलेली दिसून आली. याशिवाय जिलेबीला देखिल मोठी मागणी होत होती. त्यामुळे अगदी 70 रू. किलोपासून जिलेबीची विक्री सुरू होती.

Related posts: