|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिकेचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर

महापालिकेचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर 

सोलापुर / वार्ताहर 

 तीन महिन्यापासून रखडलेले सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक अखेर बुधवारी सत्ताधाऱयांनी मांडले. सुमारे एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटींच्या अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी मिळाली. यावेळी विरोधकांनी कोपरखळया मारत विकासाचा मुद्दा मांडला. तर सत्ताधाऱयांनीं वास्तववादी अंदाजपत्रक असल्याचे सांगितले.  

  सोलापुर महापालिकेच्या सन 2017-18 च्या अंदाजपत्रकाची सभा बुधवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमहापौर शशिकला बत्तुल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नगरसचिव प्रविण दंतकाळे उपस्थित होते. सकाळी स्थायी समिती सभापती संजय कोळी, सभागृह नेते सुरेश पाटील हे महापालिका सभागृहाकडे अंदाजपत्रक मांडण्यासाठी आले. साडे अकरा वाजता अंदाजपत्रकीय सभा सुरु झाली. अंदाजपत्रकाच्या सुरुवातीला स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी स्थायीच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. सुचना मान्य मरत मंजुरी मिळावी, असे सांगितले. त्यानंतर सभागृह नेते सुरेश पाटील यांनी अंदाजपत्रकाच्या तरतुदींचे वाचन केले.

यामध्ये आयुक्तांकडून आलेल्या व स्थायी समितीकडून आलेल्या अंदाजपत्रकामधे कपात व वाढ करत भांडवली खर्च आणि महसुली खर्च मिळुन बाराशे एकोणचाळीस कोटी 69 लाख 10 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक मांडले. आयुक्तांकडुन आलेले नऊशे 59 कोटीं 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला पाठविले होते. त्यावर स्थायीमधे 129 कोटीं 15 लाख रुपयांची वाढ करुन एक हजार 89 कोटी 13 लाख रुपयांचे अंदाजपत्रक अंदाजपत्रकीय सभेकडे पाठविले. अंदाजपत्रकीय सभेत आलेल्या या अंदाजपत्रकात सभागृह नेत्यांनी 129 कोटी 15 लाखांची वाढ केल्याने हे अंदाजपत्रक 1239 कोटींचे अंदाजपत्रक झाले.

अंदाजपत्रकीय निधीचा तक्ता –

 

 विभाग                    एकुण निधी (कोटींमधे)

 

आयुक्तांकडुन आलेले       ö    नऊशे 59 कोटीं 97 लाख  

 

स्थायी समितीकडून आलेले    ö   एक हजार 89 कोटी 13 लाख

अंदाजपत्रकीय सभेत आलेले   ö   1239 कोटी 39 लाख

 

प्रतिक्रीया ö

 वास्तववादी अंदाजपत्रक 

  1. हे अंदाजपत्रक फुगवटा न केलेले व आकडय़ांचा खेळ नसलेले आहे. वास्तववादी व अनावश्यक कामांच्या खर्चामधे कपात करुन मांडले आहे. समान निधीसह इतर मागण्या मान्य करुन हद्दवाढ भागाच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. आजपर्यंत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या तरतुदी आहेत. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या निधीचा फायदा शहराच्या विकासात होणार आहे. स्मार्ट सिटी व इतर कल्याणकारी योजनांचा समावेश करुन लोकाभीमुख कामे करण्यावर भर दिला आहे. तसेच यंदा पाणीपुरवठा, ड्रेनेज, दिवाबत्तीवर ज्यादा भर असणार आहे.

 सुरेश पाटील, सभागृह नेता, सोलापुर महानगरपालिका.

 

 समान निधी मिळावा हिच इच्छा

  1. समान निधीची मागणी विद्यमान सत्ताधाऱयांनी विरोधात असताना धरली होती. त्यानुसार आम्हालाही समान निधी द्यावा एवढीच आमची अपेक्षा होती. ती पुर्ण झाल्यास व सुचना मान्य केल्यास अंदाजपत्रकास एकमताने मंजुरीस आम्ही पाठींबा देऊ अशी आमची भुमिका होती. त्यामुळे आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे.

  चेतन नरोटे, सोमपा गटनेते काँग्रेस पक्ष.

 

 भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी ठोस काम करावे 

  1. सत्ताधाऱयांनी उशिरा अंदाजपत्रक मांडले असले तरी कामे लवकर करण्यावर भर द्यावा. प्रशासनाचा मस्तवालपणा लक्षात घेऊन नविन सदस्यांना विकासाच्या प्रवाहात नेण्यासाठी सहकार्य करावे. भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी एखादे तरी ठोस काम करावे. समांतर जलवाहीनीचे काम पुर्ण केल्यास सभागृहात दोघांचा जाहीर सत्कार करु. दररोज पाणी पुरवठा कधी होणार असा सवाल करत प्रशासन व सत्तधाऱयांवर निशाणा साधला.

 यु.एन. बेरीया, ज्येष्ठ सदस्य सोमपा काँग्रेस पक्ष.