|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा

तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा 

ऑनलाईन टीम / पुणे  :

भुमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवाडी पोलिस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.

27जून रोजी सकाळी 11.30 वाजता बालेवाडी येथील व्हीनस गॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीत तृप्ती देसाई जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन तक्रारदर विजय मकासरे यांच्यासमोर गाडी अडवी घातली. गाडी थांबावायला सांगून तृप्ती देसाई सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असे विजय मकासरे यांनी सांगितले.

 

Related posts: