|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रेल्वे संसदीयांची सीएसटीएम स्थानकाला भेट

रेल्वे संसदीयांची सीएसटीएम स्थानकाला भेट 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांची समस्या आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संसदीय स्थायी समितीकडून बुधवारी सीएसटीएम स्थानकाला भेट देण्यात आली. रेल्वे मार्गावर अपघाती मफत्यूंची तब्बल 6 हजार 55 प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष कक्षाची स्थापना करावी, अशी मागणी संसदीय समितीच्यावतीने किरीट सोमय्या यांनी केली आहे. संसदीय रेल्वे समितीच्या 13 सदस्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची पाहणी करण्यात आली.

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रुळ ओलांडताना लोकल आणि मेल-एक्प्रेसने धडक दिल्याने, लोकलमधून तोल सुटल्याने आदी विविध कारणांनी अपघात होत असतात. त्यात मफत, जखमी झालेल्या प्रवाशांना, कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी लवादात अर्ज सादर केला जातो. त्या अर्जावर न्यायाधीशांकडून निर्णय दिला जातो. या लवादात येणाऱया अर्जांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या निकालांवर वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता सातत्याने या लवादातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची सूचना केली जात होती. त्याची दखल घेत आणखी एका न्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे. रेल्वेच्या संसदीय स्थायी समितीने आज सीएसएमटी येथे भेट दिली. त्यावेळी त्यातील सदस्य खासदार किरीट सोमय्या यांनी लवादाकडील प्रलंबित अर्जांविषयी गुरुवारी या समितीसमोर मुद्दे मांडणार असल्याचे सांगितले. देशभरातील इतर लवादाकडील अर्ज तीन ते चार महिन्यात निकाली निघत असताना मुंबईत प्रलंबित अर्जांची संख्या मोठी असल्याचे सांगितले.

रेल्वे अपघातातील मफतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत चार लाख रुपये इतकी नुकसानभरपाई मिळत होती. त्यात दुपटीने वाढ होत ही रक्कम आठ लाख रुपये इतकी झाली आहे. गंभीर जखमी असणाऱया प्रवाशांना तीन लाख रुपयांची रक्कम सहा लाख रुपये इतकी देण्यात येते. महिन्याभरापूर्वी रेल्वे मंत्रालयाने नुकसानभरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts: