|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » रेल्वेच्या ऑनलाईन तिकीटावर सप्टेंबरपर्यंत ‘नो सर्व्हिस चार्ज’

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीटावर सप्टेंबरपर्यंत ‘नो सर्व्हिस चार्ज’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीटावर सप्टेंबरपर्यंत सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्यासाठी जो सर्व्हिस चार्ज आकारला जातो, तो नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आला होता. त्याची मुदत आता सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयआरसीटीच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुक करताना 20 ते 40 रुपये प्रति तिकीट सर्व्हिस चार्ज आकारला जातो. त्यामुळे आता प्रत्येक तिकिटावर 40 रुपयांपर्यंत बचत होणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आयआरसीटीला जवळपास 500 कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.