|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सरकारच्या विरोधात वारकरी आक्रमक

सरकारच्या विरोधात वारकरी आक्रमक 

पंढरपूर / प्रतिनिधी :

वारकऱयांचे दैवत असणाऱया श्री विठठल रूक्मिणी मंदिर समितीवर अध्यक्षांसह बहुतांश पदावर राजकीय लोकांचा भरणा केला आहे. याबाबत मंदिर समितीवर वारकऱयांची तसेच मांस आणि मद्यसेवन न करणाऱया व्यक्तींची निवड करा आणि अशी निवड जोपर्यत सरकार करीत नाही. तोपर्यत वारकरी संप्रदाय टप्प्याटप्प्याने सरकार विरोधी आंदोलन करणार असल्याचा इशारा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे.

श्री विठठल रूक्मिणी मंदिर समितीची आषाढी एकादशी पूर्वीच सरकारने नियुक्ती केली. यामध्ये अध्यक्षपदी कराड येथील भाजपाचे अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. तर समितीवरील अन्य सदस्यही भाजपा आणि शिवसेना यामधील राजकीय व्यक्ती असणारे निवडले आहेत. याबाबत वारकरी संप्रदायाने या नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित समितीला विरोध केला होता. याबाबत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा किमान दोन लाख भाविकांसह असलेला रथ सोहळा सरकारच्या विरोधात थांबविला होता.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांनी याबाबत आपण मंत्री महोदयांशी चर्चा करा, असे त्यासाठी आपण वेळ देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सदरचा सोहळा थांबविला होता. त्यानंतर वारकरी महाराज मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फ्ढडणवीस तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा करतील, असे वाटत होते. मात्र तसे काहीच घडले नाही.