|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आर्थिक मजबुतीशिवाय महापालिका सक्षम होणार नाही

आर्थिक मजबुतीशिवाय महापालिका सक्षम होणार नाही 

सोलापुर / वार्ताहर :

    सोलापुर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजुर झाले खरे परंतु, कर वसुली, शासनाचा निधी आणल्याशिवाय खऱया अर्थाने सोलापुरचा विकास होणअर नाही. सत्ताधारी पक्षाने वसुली आणि निधीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

   5 जुलै रोजी सुमारे 1239 कोटींचे अंदाजपत्रक एकमताने मांडण्यात सत्ताधारी यशस्वी झाले तर विरोधकात विविध मते समोर आली. विविध मुद्दयांवर विरोधकांचे एकमत झाले नसले तरी सोलापुरकरांनी केलेला अपेक्षित बदल होण्यासाठी सत्ताधाऱयांकडे आणखी इच्छाशक्ती हवी आहे.  

  एकमताने अंदाजपत्रक मंजुर झाले. दरम्यान काही गोष्टींमधुन सोलापुरकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही करवाढ व दरवाढ न करता हे अंदाकपत्रक मांडल्याने तुरतास सोलापुरकरांच्या खिशाला कात्री लागणार नाही. पाणीपट्टीमधे कपात, युजर चार्जेस सुविधा नसलेल्या भागांमधे न आकारण्याची भुमिका ठेवली. त्यांच्या मागील विरोधकांच्या कार्यकाळात केलेल्या मागण्या यंदा सत्ताकाळात पुर्ण करण्याचे ठरविले आहे.

   आजपर्यंत 25 वर्षे झाली. पण हद्दवाढ भागात अनेक असुविधांमुळे स्थानिकांचे हाल होत आहे. महापालिकेची आर्थिक कोंडी याला महत्वाचे कारण आहे. उत्पन्नातील रखडलेली वाढ, शासनाकडील प्रलंवित निधी यांमुळे महापालिकेस आर्थिक मर्यादा पडतात. एकुणच आजपर्यंत होत असलेली हद्दवाढ भागाच्या विकासाची मागणी आता पुर्ण करणार असल्याचे सत्ताधाऱयांनी सांगितले आहे. तरी आर्थिक कोंडी फुटल्यासच हे शक्य आहे.

Related posts: