|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बेळगावात बँक ऑप महाराष्ट्रमधून बारा लाख लंपास

बेळगावात बँक ऑप महाराष्ट्रमधून बारा लाख लंपास 

ऑनलाईन टीम / बेळगाव :

बेळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून 12 लाख रूपये लांबल्याची घटना किर्लोस्कर रोड शाखेत घडली. थेट कॅशियरच्या केबिनमध्ये प्रवेश करून तिथल्या ड्रॉव्हमधून बारा लाखाची रोकड लंपास केली आहे.

एकूण पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱया कैद झाली आहे. हे चोरटे तामिळनाडूचे असल्याचा पोलिसांचा प्राथमित अंदाज आहे. सकाळी बँकेचे व्यवहार सुरू झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळय़ा कॉऊंटवरील कर्मचाऱयांना माहिती विचारण्याच निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवले.नंतर कॉशियरचेही लक्ष विचलित केले. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला.