|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » मंजुळा शेटय़े हत्या प्रकरण ; साठे यांच्याकडून तपासाची सूत्रे काढली

मंजुळा शेटय़े हत्या प्रकरण ; साठे यांच्याकडून तपासाची सूत्रे काढली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भायखळा कारागृहात मारहाणीत मृत्यू झालेल्या मंजुळा शेटय़े प्रकरणाचा तपास करणाऱया स्वाती साठे यांच्याकडून तपासाची सूत्रे काढण्यात आली आहेत. आता याप्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी राजवर्धन सिन्हा करणार आहेत.

मुंबईतील भायखळा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेटय़े या महिला आरोपीला किरकोळ कारणामुळे कारागृहात गंभीर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच मंजुळा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कारागृह प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधिकारी स्वाती साठे यांच्याकडे याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र, आज त्यांच्याकडून तपासाची सूत्रे पोलीस अधिकारी राजवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपवण्यात आली.

Related posts: