|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रेल्वेच्या ऑनलाईन भर्तीप्रक्रियेने 4 लाख वृक्षांना जीवदान

रेल्वेच्या ऑनलाईन भर्तीप्रक्रियेने 4 लाख वृक्षांना जीवदान 

नवी दिल्ली :

 सर्वाधीक मनुष्यबळ असणाऱया भारतीय रेल्वे विभागाने पर्यावरणपुरक निर्णय घेत आपली भर्तीप्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या निर्णयामुळे थोडथोडपे नव्हे तर आतापर्यंत परिक्षेसाठी दरवर्षी वापरण्यात येणाऱया 319 कोटी ए4 आकाराच्या कागदोचा वापर टळला असून त्याअनुषंगाने होणारी 4 लाख वृक्षांची कत्तलही थांबली आहे. रेल्वे खात्यात भर्तीसाठी राबवण्यात येणारी नवीन ऑनलाईन प्रक्रिया ही तीन टप्प्यांची आहे. प्राथमिक, लेखी, आणि बुद्धय़ांक आणि टंक लेखन चाचणीचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे रेल्वेकडून आयोजीत केली जाणारी ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन परिक्षा आहे. परिक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या प्राथमिक उद्देशाने खात्याने 351 केंद्रावर ऑनलाईन परिक्षेचे आयोजन केले होते. यात तब्बल 92 लाख उमेदवारांनी 14,000 पदासाठी परिक्षा दिली. ऑनलाईन यंत्रणेमुळे पर्यावरणासह वेळेचेही मोठी बचत झाल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे. पारंपरिक पद्धतीने परिक्षेच्या आयोजनापासून निकाल लावण्यात दोन महिन्याहुन जास्तीचा कालावधी लागला असता. परंतु ऑनलाईन पद्धतीने काही दिवसताच परिक्षेचा निकाल जाहिर करणे शक्य झाल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले.