|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सत्यार्थींच्या देशव्यापी मोहिमेत धार्मीक नेत्यांचा सहभाग

सत्यार्थींच्या देशव्यापी मोहिमेत धार्मीक नेत्यांचा सहभाग 

नवी दिल्ली :

 नोबेल विजेते व बालहक्कसंबंधी लढा देणारे प्रसिद्ध समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांनी बाललैंगिक अत्याचार आणि तस्करीविरोधातील नव्या मोहिमेची शुक्रवारी घोषणा केली. ‘सुरक्षित बालपण सुरक्षित भारत’ नावाची ही मोहिम वर्षभर सुरू राहणार असून ऑगस्टपासून याची सुरूवात होणार असल्याची घोषणा कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फॉउंडेशनकडून करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे या मोहिमेत विविध धर्म आणि पंथाच्या धर्मगुरूंना सहभागी करून घेण्यात आले आहे. अब्जावधी लोकांवर प्रभाव असणाऱया धार्मीक नेत्यांच्या सहभागामुळे बालकांवरील अत्याचार थांबवण्यासंबंधी आपल्या मोहिमेची व्यापकता आणि परिणामकता वाढणार असल्याचे सत्यार्थी यांनी सांगितले. गुरूवारी सांयकाळी निजामुद्दीन दर्ग्याचे सुफी संत अजमल निझामी, आर्चबिशप सॅम्युल प्रकाश, निलकाशी राजखोआसहीत अनेक सन्मान्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. बाल अत्याचार हा देशापुढील एक ज्वलंत प्रश्न आहे. असे सांगत सर्व उपस्थित मान्यवरांनी सत्यवर्थी यांच्या या महत्त्वकांक्षी देशव्यापी मोहिमेला पाठिंबा जाहिर केला.