|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ग्रा. पं. निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी करा : पाटील

ग्रा. पं. निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी करा : पाटील 

पेठ वडगाव / प्रतिनिधी

     आगामी भादोले ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी  भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

            यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दत्ताजीराव पवार, सुरेश पाटील, नागेश पाटील, रियाज जमादार, संतोष पाटील, अर्जुन जामदार, विजय पाटील, नानासाहेब जाधव, दीपक ढाले, अमित कांबळे, सुनिल चोपडे, अनिल माने, तानाजी पाटील, उत्तम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

            यावेळी भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. भादोले गावचा विकासाच्या दृष्टीने भाजपची सत्ता या गावावर आणण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. आगामी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे. थेट सरपंच निवडणुकीत गावचा सरपंच भाजपचा आणि सत्ताही भाजपचीच असली पाहिजे या करिता आता कार्यकर्त्यांनी व्यूहरचना करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related posts: