|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नेज येथे सोळा मेंढय़ा दगावल्या

नेज येथे सोळा मेंढय़ा दगावल्या 

वार्ताहर/ बेडकिहाळ

तागाचा पाला खाल्याने झालेल्या विषबाधेतून 15 मेंढय़ा दगावल्याची घटना 5 रोजी नेज हद्दीत घडली आहे. या घटनेत सुमार दीड लाखांचे नुकसान झाले आहे. भागन्ना सिद्धा गावडे व अजित भरमा गावडे (रा. शमनेवाडी) अशी नुकसानग्रस्त मेंढपाळांची नावे आहेत. या घनटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी, भागन्ना गावडे व अजित गावडे हे आपल्या शंभर मेंढय़ा नेज हद्दीतील चव्हाण मळा परिसरात चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारच्या शेतातील ताग काही बकऱयांनी खाल्ले. काही वेळाने ताग खाल्लेल्या मेंढय़ा दगावण्यास सुरुवात झाली. याची माहिती गावडे यांनी एकसंबा येथील डॉ. निलजगी यांना कळविली. त्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन उपचारास प्रारभ केला. पण तोपर्यंत 16 मेंढय़ा दगावलेल्या होत्या.

या घटनेत गावडे बंधुंना दीड लाखांचा फटका बसला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी सदलगा येथील डॉ. गस्ते, डॉ. कुपाटे यांच्यासह नेज जि. पं. सदस्य सुदर्शन खोत, शमनेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष दीपक खोत, नेज ग्रा. पं. अध्यक्ष आप्पासाब सुट्टटे, सदस्य कल्लाप्पा गावडे, शितल पट्टणकुडे, डॉ. नाभिराज पाटील, नेज पीडीओ बिरादार यांच्यासह ग्राम सहकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी वैद्याधिकाऱयांनी मेंढय़ांचे शवविच्छेदन करून नमुने बेळगाव येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या या नुकसानग्रस्त मेंढपाळांना आर्थिक नुकसान भरपाई करून देण्यासाठी आमदार, जि. पं. सदस्यांसह पशू खात्याने प्रयत्न करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भरमा पुजारी, आण्णाप्पा पुजारी, म्हाळू गावडे, विरा पुजारी, मनगेनी गाळे, अप्पू भानुसे, महादेव कोळेकर यांच्यासह नेज, शमनेवाडी येथील ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.

Related posts: