|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » येरवडा कारागृहात एका कैद्याकडून दुसऱया कैद्याची हत्या

येरवडा कारागृहात एका कैद्याकडून दुसऱया कैद्याची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱया कैद्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करीत होते. त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यातील एका कैद्याने दुसऱया कैद्याचे लक्ष नसताना त्याच्यावर दगडाने हल्ला केला. यात सुखदेव मेघराज महापूर या कैद्याचा मृत्यू झाला. सुखदेव अपहरणाच्या गुह्यात 4 वर्षांची शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने येरवडा पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले.

Related posts: