|Thursday, November 21, 2019
You are here: Home » विविधा » 12 वर्षांच्या मुलाने चालवली बस

12 वर्षांच्या मुलाने चालवली बस 

ऑनलाईन टीम / बीजिंग :

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक 12 वर्षांचा मुलगा बस चालवताना दिसत आहे. ही घटना चीनमधील असल्याचे व्हिडिओतून समजत आहे. या मुलाने 40 मिनिटे ही बस चालवली तेव्हा तेथील पोलीस विभागाचीही या घटनेने धावपळ झाली. चीनमधील रोडवर हा मुलगा लक्झरी बस चालवत होता तेव्हा पाहणाऱयाच्या अंगाचा थरकाप उडाला.

या मुलाला घेऊन नंतर पोलीस ठाण्यात गेले.याच वेळी काही लोकांनी या मुलाचा व्हिडिओ तयार केला असे सांगण्यात येत आहे. या मुलाने ही बस चोरली होती. या बसची काच फुटलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने यावेळी कोणताही अपघात झाला नाही. पोलिसांनी या मुलाला थांबविल्यानंतल सर्वांचाच जीव भांडय़ात पडला.

 

Related posts: