|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » शिवसेना दोन्ही बाजूंनी ढोल बडवतेय ; अजित पवारांची टीका

शिवसेना दोन्ही बाजूंनी ढोल बडवतेय ; अजित पवारांची टीका 

ऑनलाईन टीम / कल्याण :

शिवसेना दोन्ही बाजूने ढोल बडवत आहे, एकीकडे सत्तेची मजा चाखायची आणि दुसरीकडे भाजपविरोधात भूमिका घेऊन आम्ही जनतेसोबत आहोत, शेतकऱयांसोबत आहोत असेही भासवायचे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

ते म्हणाले, शिवसेनेची सध्याची अवस्था दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेचा संसार करायचा आणि मग त्यांच्यावरच टीका करुन वेगळी भूमिका घेतल्याचा आव आणायचा, हे शिवसेनेचे नाटक आहे. शिवसेना दोन्ही बाजूंनी ढोल बडवत आहे. एकीकडे सत्तेची मजा चाखायची आणि दुसरीकडे भाजपविरोधात भूमिका घेऊन आम्ही जनतेसोबत आहोत, शेतकऱयांसोबत आहोत असेही भासवायचे. मात्र, जनतेला आता हा दुटप्पीपणा लक्षात आला आहे, असेही पवार म्हणाले.

Related posts: