|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » काश्मीरसारखी दार्जिलिंगमध्येही भाजप हिंसा पसरवतेय : ममता बॅनर्जी

काश्मीरसारखी दार्जिलिंगमध्येही भाजप हिंसा पसरवतेय : ममता बॅनर्जी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सिक्किम आणि काश्मीरसारखी दार्जिलिंगमध्येही भारतीय जनता पक्षाकडून हिंसा पसरवली जात आहे, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

पश्चिम बंगालच्या बशीरहाट आणि दार्जिलिंगमध्ये विरोधकांकडून हिंसा पसरवली जात आहे. दार्जिलिंगच्या हिंसेच्या मुद्यावरुन त्या म्हणाल्या, दार्जिलिंगमधील हिंसेबाबत केंद्र सरकारकडे वारंवार संपर्क केला जात आहे. तसेच याप्रश्नी 6 वेळा केंदीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच याबाबतचा दंगा भडकवण्यास माध्यमांच्या भूमिका तपासायला हवी, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, याबाबतच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याचेही ममता बॅनर्जी म्हणाले.