|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दार्जिलिंगमध्ये पुन्हा हिंसाचार, अनेक ठिकाणी जाळपोळ

दार्जिलिंगमध्ये पुन्हा हिंसाचार, अनेक ठिकाणी जाळपोळ 

दार्जिलिंग :

 पश्चिम बंगालच्या उत्तर डोंगराळ भागात सुरू असलेल्या अस्थिरतेदरम्यान कथितरित्या पोलिसांच्या गोळीबारामुळे एका गोरखालँड समर्थकाचा मृत्यू झाल्यानंतर भडकलेला हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना रविवारी देखील सुरूच राहिल्या. निदर्शकांनी रविवारी सकाळी कुरसियोंग येथील शासकीय कार्यालय पेटवून दिले. पश्चिम बंगालपासून स्वतंत्र गोरखालँड राज्य निर्मितीची मागणी करणाऱया जमावाने रविवारी पोखरिबिंग पंचायत कार्यालय देखील पेटविले तसेच दार्जिलिंगच्या पोखरीमध्ये स्थित पोलिसांच्या सीमा चौकीची तोडफोड केली. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या समर्थकांनी शनिवारी देखील अनेक ठिकाणी निदर्शने करत पोलीस चौक्या आणि शासकीय कार्यालयांची तोडफोड केली होती. स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून पश्चिम बंगालचा हा भाग एक महिन्यापासून हिंसाचाराने ग्रस्त आहे. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया जीजेएमने अनिश्चित काळासाठी बंद पुकारल्याने पर्यटकांचे हाल झाले.