|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हयात 9 लाख 9 हजार वृक्षारोपण

जिल्हयात 9 लाख 9 हजार वृक्षारोपण 

प्रतिनिधी/ सांगली

राज्यात 4 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमार्तंगत सांगली जिल्हात वन महोत्सव सप्ताहात 9 लाख् 9 हजार रोपांची लागवड केली असल्याची माहिती उपवनसरंक्षक भारतसिंह हाडा यांनी दिली आहे.

गेली सात दिवस जिल्हयात वृक्ष लागवड मोहित प्रभावीपणे हाती घेण्यात आल्याचे सांगून हाडा म्हणाले,  सांगली जिल्हयात 8 लाख 84 हजार झाडे लावण्याचे उदिष्ट होते. यामध्ये वनविभागास 4 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 64 हजार, ग्रामपंचायत विभागास 2 लाख 55 हजार व इतर विभागांना 1 लाख 65 हजार इतके उदिष्ट देण्यात आले होते. गेल्या आठवडाभरात सर्व विभागांच्या सहकार्याने 9 लाख 9 हजार झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये वनविभगाने 4 लाख 41 हजार, सामाजिक वनिकरण विभागाने 64 हजार, ग्रामपंचायत विभागाने 2 लाख 65 हजार व इतर विभागांनी 1 लाख 39 इतकी झाडे लावली आहेत.

वृक्षलागवड उदिष्टपूर्तीमध्ये जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्याचबरोबर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत व इतर यंत्रणांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत वृक्षारोपणाकरीता वेळ दिला. व उध्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण केल्याचेही भारतसिंह हाडा यांनी यावेळी बोलतना सांगितले.

Related posts: