|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » अंदोलक प्रवाशांनी रोखली ‘डेक्कन क्वीन’रेल्वे

अंदोलक प्रवाशांनी रोखली ‘डेक्कन क्वीन’रेल्वे 

ऑनलाईन टीम / पुणे :

चाकरमान्यांच्या हक्काची डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस संतप्त प्रवाशांनी धरल्याने सोमवाली पुणे स्थानकावरून तब्बल 50 मिनिटे उशिराने ही गाडी निघाली. यामुळे दररोज सकाळी 7.15 वाजता निघणारी डेक्कन क्वीन आज सकाळी 8 च्या सुमारास मुंबईकडे रवाना झाली. नेहमी फलाट क्रमांक 1 वरून निघणारी डेक्क्न क्वीन गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक 5 वरून निघत आहे. यासंबंधी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नियमित प्रवाशांती ही एक्सप्रेस रोखून धरल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवार कामाचा दिवस असल्याने प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. परंतु, नियमित प्रवाशांनी अचानक पवित्रा घेतल्याने इतर प्रवाशांनी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक प्रवाशांना कशामुळे उशीर होतोय याची माहिती मिळत नव्हती. अखेर 8च्या सुमारास आंदोलकांनी नमते घेतल्यानंतल डेक्कन क्वीन मुंबईकडे मार्गस्थ झाली. डेक्कन क्वीन नंतर निघणाऱय रेल्वेही मुंबईकडे मार्गस्थ झाल्या होत्या. परंतु, डेक्कन क्वीन निघत नसल्याने प्रवाशांमध्ये काही काळ अस्वस्थता पसरली होती.

 

Related posts: