|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » मोबाईलच्या किमतीत होणार वाढ

मोबाईलच्या किमतीत होणार वाढ 

नवी दिल्ली :

 1 जानेवारी 2018 पासून देशातील प्रत्येक मोबाईल फोनमध्ये जीपीएस लावण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा समजण्यास मदत होईल. आता फिचर फोनमध्येही जीपीएस असणे अनिवार्य असल्याने त्यांच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत वाढतील. फिचर फोनच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हे फोन महाग होतील असे मोबाईल कंपन्यांनी म्हटले आहे. फिचर फोनमध्ये जीपीएस लावल्यास उत्पादन खर्चात 400 रुपयांनी वाढ होईल. गेल्या मार्च महिन्यापासून फोनमध्ये पॅनिक बटन बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएसमुळे कोणत्याही वापरकर्त्याचा ठावठिकाणा घेणे सोपे होते.

Related posts: