|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » चीनचे 13 लाख सैनिक सेवेतून लवकरच होणार कमी

चीनचे 13 लाख सैनिक सेवेतून लवकरच होणार कमी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगातील सामर्थ्यशाली सैन्यांमध्ये समावेश असलेल्या चीनच्या लष्करातील तब्बल 13 लाख सैनिकांना सेवेतून लवकरच कमी केले जाणार आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी सैन्य कपात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या चीनच्या सैन्यात तब्बल 23 लाख सैनिक सेवेत आहेत. चीनकडून पुनर्गठन प्रक्रिया करण्यात येणार असून, त्यामुळे चिनी सैन्याचा आकडा 10 लाखांपर्यंत जाणार आहे. चीनच्या पीपल्स आर्मीमधून सैनिकांची संख्या कमी केली जाणार असून, त्याऐवजी क्षेपणास्त्रs, दारुगोळा यांच्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ‘पीएलए डेली’ने दिले आहे.

Related posts: