|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकाविरोधी कृत्यांसाठी पाकला जबाबदार ठरवावे

अमेरिकाविरोधी कृत्यांसाठी पाकला जबाबदार ठरवावे 

अमेरिकेच्या खासदाराची मागणी :

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेपोटी अमेरिका निराश झाला आहे. अमेरिकेच्या हितांच्या विरोधात सातत्याने काम करण्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविण्याची वेळ आल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ खासदार टेड पो यांनी म्हटले. द वॉशिंग्टन टाईम्सने ‘पाकिस्तान लाँग हिस्ट्री ऑफ डुप्लिसिटी’ शीर्षकाने संपादकीय सादर केले असून यात पो यांनी हा उल्लेख केला.

पाकिस्तानच्या विश्वासघातानंतर देखली अमेरिका संबंध तोडण्यास किंवा कमी करण्याच्या विरोधात राहिला आहे. अफगाणिस्तानात आघाडी सैन्याला रसद आणि शस्त्रास्त्रs पाकच्या माध्यमातूनच पोहोचविली जात असल्याने असे करावे लागत असल्याचे वक्तव्य रिपब्लिक खासदाराने केले.

परंतु याचा अर्थ या ‘महत्त्वाच्या दुव्या’ला (पाकिस्तान) मोकाट सोडले जावे असा होत नाही. पाक आपले सैन्य आणि आमच्या सैन्यादरम्यानच्या हिंसक घटनांनंतर अनेकवेळा दूर झाला आहे. पाकवरील आमचा दबाव कायम राहावा याकरता अलिकडेच अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात त्याच्या विरोधात 2 विधेयके मांडल्याचे पो म्हणाले.

पहिले विधेयक

एका विधेयकात पाकला देण्यात आलेला महत्त्वाचा बिगरनाटो सहकाऱयाचा दर्जा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पाकला हा दर्जा 2004 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिला होता. यांतर्गत अल कायदा आणि तालिबानविरुद्ध  अमेरिकेच्या लढाईत पाक मदत करतो.

दुसरे विधेयक

दहशतवादी आणि दहशतवादाला पाकच्या सहकार्याच्या दीर्घ इतिहासाचा अभ्यास करणे दुसऱया विधेयकामुळे गृह मंत्रालयाला अनिवार्य ठरणार असल्याचा दावा टेड पो यांनी केला.

अमेरिकनांच्या रक्ताने माखलेत हात

पाकला अमेरिकेच्या नागरिकांच्या रक्ताने आपले हात माखण्यासाठी जबाबदार ठरविले जावे अशी मागणी पो यांनी केली. विदेश विषयक समितीचे सदस्य असण्याबरोबरच दहशतवाद आणि व्यापारासाठीच्या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत.