|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात आयटी इंजिनियरची आत्महत्या

पुण्यात आयटी इंजिनियरची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

आंध्र प्रदेशातून 3 दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. गापीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या इंजिनिअरचे नाव आहे. तो मुळचा आंध्र प्रदेशातील क्रिष्णा जिह्यातील रहिवासी होता.

तीन दिवसांपूर्वी गोपीकृष्ण पुण्यात एका कंपनीत रूजू झाला होता.तिसऱया दिवशी त्याने आत्महत्या केली. ‘आयटी क्षेत्रात नोकरीची अनिश्चितता असल्यानश आपण आत्महत्या करत असल्याचे या तरूणाने सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. ‘आयटी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मला माझे भविष्य अंधकारमय वाटते.अर्थिकदृष्टय़ा सक्षम नाही. त्यामुळे मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते माझा कुंटबाची काळजी घ्या. सॉरी. गुड बाय’ असा उल्लेख त्याने या नोटमध्ये केला आहे.

 

Related posts: