|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाला ‘कायाकल्प’ पुरस्कार प्रदान

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाला ‘कायाकल्प’ पुरस्कार प्रदान 

गडहिंग्लज :

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा ‘कायाकल्प’ पुरस्कार यावर्षी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाला जाहीर झाला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी ही माहिती दिली.   

शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी जिल्हा व ग्रामीण रूग्णालयांची पहाणी करून 100 पैकी गुणात्मक नोंद घेत परिक्षण केले जाते. शासनाच्या वतीने नियुक्त केलेल्या पथकाकडून पाहणी केली. त्यामध्ये रूग्णालयाची आतील व बाहेरील स्वच्छता, जैव कचरा विघटन, सोयी सुविधा, आयसीयू अशा गोष्टींची माहिती घेत गुणदान करण्यात आले. त्यामध्ये गडहिंग्लज रुग्णालयाला 70 गुण मिळाल्याने विभागून उत्तेजनार्थ तिसरा पुरस्कार देण्यात आला आहे. वैद्यकिय अधिक्षक डॉ. आंबोळे, डॉ. रमेश रेडेकर, डॉ. श्याम सागर, डॉ. साव्यान्नावर, डॉ. मारूती कांबळे, डॉ. एल. एस. पाटील, डॉ. सी. जे. शिंदे यांनी हा पुरस्कार स्विकारला. एक लाख रोख, प्रमाणपत्र व शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, खासदार अरविंद सावंत, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंघ, आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. सतिश पवार, अतिरीक्त संचालक अर्चना पाटील आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याने गडहिंग्लज रूग्णालयातील साऱयांचे कौतुक होत आहे.

Related posts: