|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » म्हाकवे-हदनाळ रस्त्याचे काम सुरु

म्हाकवे-हदनाळ रस्त्याचे काम सुरु 

वार्ताहर /म्हाकवे  :

गेली चौदा वर्षे म्हाकवे-हदनाळ दरम्यानचा प्रलंबीत असलेला म्हाकवे हद्दीतील दीड कि. मी. चा रस्ता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूर्णपणे वाहून गेला होता.  या रस्त्याचे काम त्वरित न केल्यास दोन्ही गावादरम्यानचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त ‘दै. तरुण भारत’ ने दि. 6 जुलै रोजीच्या अंकात सचित्र प्रसिध्द केले होते. या  वृत्ताची दखल घेऊन लगेचच तिसऱया दिवशी आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीने या रस्त्याचे काम सुरु केले आहे. याबद्दल ‘दै. तरुण भारत’ चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

म्हाकवे ते हदनाळ दरम्याच्या तीन  कि. मी रस्त्यापैकी दीड कि. मी. अंतर कर्नाटक हद्दीत तर दीड कि. मी. अंतर महाराष्ट्र हद्दीत येते. चौदा वर्षापूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून म्हाकवे हद्दीतील दीड कि. मी. रस्त्याचे काम झाले होते. त्यानंतर मात्र महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले होते. यामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालताना अडथळा निर्माण होत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र सीमावादात हा रस्ता अडकला होता. कर्नाटक हद्दीतील हदनाळ हे शेवटचे गाव असले तरी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना या परिसरातून ऊस पुरवठा होतो.

गेल्या चार दिवसांपासून या मार्गावरील बसफेऱयाही बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे दररोज हदनाळ येथून म्हाकवेपर्यंत सुमारे 100 कामगारांना पायी चालत यावे लागत होते. कुर्ली, आप्पाचीवाडी परिसरातून सुमारे 60 महाविद्यालयीन विद्यार्थी, हायस्कूलचे विद्यार्थी यांना पाययीट करावी लागत होती. तसेच हायस्कूल विद्यार्थ्यांच्या पालकांना रोज आपल्या मुलांना सोडण्यासाठी यावे लागत होते. याचदरम्यान  येथील ग्रामस्थांनी समरजितसिंह घाटगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बसफेऱया सुरु करण्यात आल्या आहेत.

Related posts: