|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये संततधार पाऊस, गोदावरी नदीला पूर

नाशिकमध्ये संततधार पाऊस, गोदावरी नदीला पूर 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक शहर परिसरात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.

दशक्रिया विविधसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेत सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असूत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.