|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » साडेपाच लाख खातेदार ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

साडेपाच लाख खातेदार ‘प्राप्तिकर’च्या रडारवर 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा जमा करणाऱयांपैकी 5 लाख 56 हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात गोंधळ असल्याचे समोर आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर काळय़ा पैशांचा छडा लावण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 31 जानेवारीपासून ‘स्वच्छ धन अभियान’ सुरु केले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख 92 हजार नागरिकांकडून आर्थिक ताळेबंदाची माहिती मागवण्यात आली. यातील 9 लाख 72 हजार नागरिकांनीच आर्थिक ताळेबंद सादर केला. उर्वरित नागरिकांच्या बँक तपशीलाची झडती प्राप्तिकर विभागाकडून घेण्यात येत आहे. या अभियानाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यापासून सुरु झाला. या टप्प्यानंतर 5 लाख 56 हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात संशयास्पद स्थिती आढळून आली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने प्राप्तिकर विभागाकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

Related posts: