|Thursday, August 22, 2019
You are here: Home » विविधा » केंद्रात ओबीसींची 11 हजार पदे रिक्त !

केंद्रात ओबीसींची 11 हजार पदे रिक्त ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एकूण 11 हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने संसदीय समितीपुढे सादर केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

राज्यसभेतील निवड समितीने काही दिवसांपूर्वी केंद्रातील नोकर भरतीत ओबीसींसाठीची 27 टक्क्यांची मर्यादा वाढवावी, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना सार्वजनिक तक्रार, मनुष्यबळ आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने म्हटले, सध्याच्या घडीला प्रवर्गातील 19,997 पदे रिक्त आहेत. यामध्ये गृह मंत्रालयात सर्वाधिक 3,397, महसूल विभागात 2,988, अर्थ खात्यात 1,425 आणि संरक्षण विभागात 1,268 पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.