|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता : फ्रेंच अहवाल

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता : फ्रेंच अहवाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

18 ऑगस्ट 1945 रोजी झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद बोस यांचा मृत्यू झालाच नव्हता. ते 1947 पर्यंत जिवंत होते, अशी माहिती फ्रेंच अहवालात देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून नेताजी सुभाषचंद बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा दावा खोटा असल्याचे सांगत फ्रेंच अहवाल समोर आला आहे. प्रेंच सरकारच्या अर्काईव्हजमध्ये 11 डिसेंबर 1947 रोजी हा अहवाल जमा करण्यात आला होता. तसेच पॅरिसमधील इतिहासकार जे. पी. बी. मोर यांनी या अहवालाच्या आधारे काही धक्कादायक दावे केले आहेत.

त्या अहवालाच्या माहितीनुसार, तैवान येथे झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात कोठेही नमूद करण्यात आलेले नाही. तसेच डिसेंबर 1947 पर्यंत त्यांचा ठावठिकाणा माहिती नव्हता, असेही या अहवालात म्हटले आहे.

Related posts: