|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » बसस्टॉपमध्ये दोन पिढय़ांची भिन्न विचारसरणी

बसस्टॉपमध्ये दोन पिढय़ांची भिन्न विचारसरणी 

मराठी चित्रपटसफष्टीतील देखण्या आणि प्रसिद्ध स्टारकास्टना एकत्र आणणाऱया ‘बसस्टॉप’ या आगामी सिनेमाचा डिजिटल ट्रेलर नुकताच लाँच झाला. डिजीटलायजेशन या युगात व्हायरल झालेल्या या ट्रेलरने अल्पावधीतच रसिकांची वाहवा मिळवली आहे. गणराज असोशिएट्स प्रस्तुत आणि रॅपर श्रेयश जाधव निर्मित या सिनेमाचे समीर हेमंत जोशी यांनी दिग्दर्शन केले असून, हा सिनेमा मराठी चित्रपटसफष्टीतील मल्टीस्टारर चित्रपटाच्या यादीत गणला जाणार आहे.

सोशल साईटवर रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टिजर पोस्टरएवढीच प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे कॉलेज तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात दोन पिढय़ांची विचारसरणी आणि जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये केला आहे. कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणं, मैत्री ट्रेलरमध्ये दिसून येत असून दुसऱया बाजूला पालकांची मानसिकतादेखील यात मांडण्यात आली आहे. तरुण मुला-मुलींचे पालक आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला किती पटतात याचा उहापोह यामध्ये दिसून येतो. अमफता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे अशा तरुण कलाकारांचा ताफा यात दिसत असून अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे ज्येष्ठ कलावंतदेखील आपणास या ट्रेलरमध्ये दिसून येतात.

युवा पिढी आणि त्यांचे पालक यांच्यातील वैचारिक दरी आणि त्यावरून होणारे वाद अगदी विनोदी ढंगात या ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहेत. ‘बसस्टॉप’ या सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीसाठी पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या तिघांनीदेखील महत्वाची भूमिका निभावली असून, घराघरात होत असलेल्या जनरेशन गॅपच्या कुरघोडी सिनेमात कॅमेऱयाद्वारे कैद करण्याचे काम छायाचित्रकार अभिजित अब्दे यांनी केले आहे. हा सिनेमा 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.