|Sunday, December 8, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वृषपर्व्याची अगतिकता

वृषपर्व्याची अगतिकता 

देवयानीची भयंकर मागणी आणि आपली अगतिकता शर्मि÷sसमोर स्वतःच्या तोंडाने प्रकट करण्याचे धाडस दानवराज वृषपर्व्यापाशी नव्हते. कोणता बाप आपल्या हाताने आपल्या लाडक्मया लेकीला गुलामगिरीच्या नरकात लोटू शकेल? कोणता राजा आपल्या अत्यंत लाडात वाढलेल्या, राजवैभवात लोळत असलेल्या राजकन्येला आपल्या तोंडाने सांगू शकेल की तिने यापुढील आयुष्यभर बटिक, दासी बनून राहावयाचे आहे?

अगतिक झालेल्या वृषपर्व्याने शर्मि÷sच्या दाईला बोलावून घेतले. तिला सर्व परिस्थिती त्याने समजावून सांगितली आणि शर्मि÷sला आवश्यक त्या त्यागासाठी सज्ज करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपविली.

राजाचे ते भाषण ऐकल्यावर दाई शर्मि÷sकडे गेली व तिला म्हणाली-हे कल्याणी, देवयानीच्या सांगण्यावरून दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या शिष्यांचा, सर्व असुरांचा त्याग करण्यास उद्युक्त झाले आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत थांबवणे आवश्यक आहे. शुक्राचार्यांनी दानव कुळाचा त्याग केल्यास सर्व असूर अत्यंत हीन दीन होतील. शुक्राचार्यांनी केवळ दानवांच्या कल्याणाकरिता खडतर तपस्या करून संजिवनी विद्या प्राप्त करून घेतली आणि या विद्येच्या जोरावरच आजवर आपले दैत्य सैन्य स्वर्गातील देवांच्या सेनेशी मुकाबला करू शकले आहे. शुक्राचार्य आमचा त्याग करून निघून गेल्यास त्यांच्याबरोबर त्यांची संजीवनी विद्या देखील आमचा त्याग करून निघून जाईल. याउलट देवांचे गुरु बृहस्पती यांचा पुत्र कचदेव याने शुक्राचार्यांकडूनच ही संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली आहे कचदेव आता स्वर्गात पोहोचला असून त्याने आपल्या काही शिष्यांनाही ही विद्या शिकविली असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आता शुक्राचार्य आम्हाला सोडून निघून गेल्यावर जर देव दानव संग्राम झाला तर कोणाचा पराभव होईल हे तुला काय वेगळे सांगायला हवे?

त्यामुळे हे निष्पापे, शुक्राचार्यांची कन्या देवयानीची जी मनोकामना असेल, ती आज तू पूर्ण केली पाहिजे. सर्व दानव कुळाच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न आहे हे तू ध्यानात घे. तुला आत्यंतिक त्याग करावा लागेल पण तुझ्या या त्यागामुळेच दानव कुळ वाचू शकेल अन्यथा दानव कुळ नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. शर्मि÷s, मनाची पूर्ण तयारी करून अत्यंत शांतपणे देवयानीने केलेली भयंकर यातनादायक मागणी आता ऐक. देवयानीच्या मागणीप्रमाणे तुला तातडीने या राजप्रसादाचा आणि राजवैभवाचा पूर्ण त्याग करून आपल्या सहस्र दासींसह देवयानीकडे जावून तिची बटिक व्हावे लागेल. एवढेच नव्हे तर देवयानीचे पिता शुक्राचार्य हे देवयानीचा विवाह ज्यावेळी लावून देतील त्यानंतर देवयानी सोबत आपल्या या सहस्र दासींसह देवयानीची बटिक म्हणून, तिच्या पाठोपाठ तुलाही देवयानीच्या पतीच्या गृही कायमचे जावून राहावे लागेल व देवयानी सांगेल तशी तिची सेवा आजन्म करावी लागेल.

Related posts: