|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपती निवडणूक: व्यंकय्या नायडूंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

उपराष्ट्रपती निवडणूक: व्यंकय्या नायडूंनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी ऑगस्टमध्ये होणाऱया उपराष्ट्रपतापदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याची चर्चा होती, मात्र सोमवारी अमित शहांनी नायडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज नायडूंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यूपीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांची घोषणा केल्यानंतर एनडीएने व्यंकय्या नायडू यांचे नाव जाहीर केले. केंद्रीय नगरविकास मंत्री म्हणून व्यंकय्या नायडू काम करत होते दरम्यान काल भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी उपराष्ट्रपतीपदासाठी नायडूंच्या नावाची घोषणा केल्यानंतर नायडूंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे खाते स्मृर्ति इराणी संभाळणार आहेत. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी आणि व्यंकय्या नायडू यांच्यात चुरशीची लडत पहायला मिळणार आहे.

 

 

Related posts: