|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सध्या केंद्रात सात मंत्रिपदे रिक्त असून, यापैकी एका मंत्रालयाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपावला जाऊ शकतो.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून वेंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील शहर विकास, माहिती व प्रसारण आणि शहरी दारिद्य निमूर्लन या मंत्रिपदांचे राजीनामे सोपवले आहेत. सध्या या खात्यांचा अतिरिक्त पदभार केंद्रातील मंत्र्यांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या विस्तारादरम्यान फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: