|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

आषाढी अमावास्येला दिव्यांचे पूजन करा भाग्य उजळेल

उत्तरार्ध

बुध. दि. 18 ते 25 जुलै 2017

आषाढी अमावास्येला ऊस अथवा आंबा किंवा उपलब्ध असणारी नारळ वगैरे फळांच्या रसाने लक्ष्मीला अभिषेक करा. केवळ खजान्यात प्रसिद्ध झाले आहे म्हणून पुजा करू नका. आपले व इतरांचे सर्वार्थाने भले व्हावे ही भावना ठेवून ती पूजा करा. इतरांनाही सांगा त्यांचेही कल्याण होईल. दिव्याचे अनेक मंत्र आहेत जो मंत्र माहीत आहे तो म्हणा. मुलांनाही म्हणण्यास सांगा. त्याचा निश्चित चांगला व रोकडा अनुभव येईल. ही अमावास्या सर्व बाबतीत कल्याण करणारी आहे, तिचे पावित्र्य भंग होईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. या अमावास्येच्या दीप पूजन व लक्ष्मी पूजनाने बरीच संकटे नाहीशी होतात पण हे सगळे जरी खरे असले तरी आपली बाजू सत्याची असेल तरच दैवी शक्तीचे सहाय्य मिळेल हे विसरु नये. हेतू चांगला असेल तर या अमावास्येच्या पूजनाने तुमचे सर्वार्थाने कल्याण होईल. शिक्षणात यश, लक्ष्मीची  कृपा, सांसारिक जीवनात मंगलमय वातावरण, आर्थिक सुबता, आरोग्य लाभ, मनोकमाना पूर्ती, मुलाबाळांचे कल्याण, नोकरी उद्योग व्यवसायात भरभराट, करणीबाधा नष्ट होणे, अनिष्ट प्रवृत्तींच्या शक्तींपासून रक्षण, शिक्षणात चांगले यश, अपघात व दुर्घटनेपासून रक्षण यासह अनेक फायदे होतात. तांबे, सुवर्ण, चांदी अशा धातूचे दिवे त्या दिवशी लावतात. तांब्याचा दिवा सर्वश्रे÷ मानलेला आहे. दिव्याचे पूजन कसे करावे ते भटजींना विचारून घ्या. दिव्याचे पावित्र्य फार पाळावे लागते. अशुद्ध अवस्थेत दिवा पेटवू नये. अथवा पेटत्या दिव्याला स्पर्श करू नये. कोणतेही कार्य करण्यापूर्वी दिव्याला साक्षी ठेवूनच ते काम करतात. औक्षण करणे, ओवाळणे वगैरे प्रकार दिव्याशी संबंधित आहेत. काही धर्मात लोक मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करतात. हिंदू धर्मियांनी अशी घोडचूक कधीही करू नये. अन्यथा अरिष्टाला आमंत्रण दिल्यासारखे होते. देवासमोर दिवा पेटून पेटती काडी काहीजण पायाने विझवितात. असे कधीही करू नका. अग्नीचा अपमान म्हणजे दिव्याचा अपमान व पुढे संकटाला निमंत्रण हे लक्षात ठेवावे. दिव्याचा जितका मान ठेवाल त्याप्रमाणात अनेक पिढय़ांचा उद्धार होतो तर दिव्याचा अपमान केल्यास अनेक पिढय़ांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. दिवा अथवा अग्नि कधीही ओलांडू नये, अथवा त्याला पाय लावू नये. काही जत्रेत इंगळे यात्रा असतात. पेटत्या विस्तवातून लोक पळत असतात. वास्तविक हे चुकीचे आहे. अग्निला तुडवून त्यावर पळत जाणे हा अग्निचा घोर अपमान आहे, त्यामुळे अशा प्रथा बंद करणे आवश्यक आहे. दिव्याचा अथवा अग्निचा अपमान म्हणजे स्वत:हून दारिद्रय़ाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. काही वैदिक मंत्रोचाराने सिद्ध केलेल्या यज्ञात मुक्मया प्राण्यांचा बळी देतात. जेथे यज्ञ चालू असतो तेथे आत्यंतिक पावित्र्य पाळावे लागते. मग बळी देवून त्याचे पावित्र्य भंग का करता? यज्ञात बळी देण्याची प्रथा आहे असे काही यज्ञकर्त्यानी सांगितले. पण हा घोर अपराध आहे. त्याचे पुढे अनिष्ट परिणाम होतात व संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. संत ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंतानी यज्ञातील बळी देण्याच्या प्रथेला प्रखर विरोध केला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे.

 

मेष

 सर्व कामात मोठे यश मिळेल. करार मदार, प्रवास, वाटाघाटी महत्त्वाच्या व्यवहारासाठी बोलणी वगैरे करण्यास हरकत नाही. आर्थिक सुधारणा होतील हा काळ शुभ असल्याने जे काम कराल ते यशस्वी होईल. नोकरी, वास्तू, देणीघेणी यासह जे व्यवहार अडले असतील तर सुरळीत पाय पडतील, पण व्यसन व चचलपणापासून दूर रहा.


वृषभ

काही वेळा घाई गडबडीत केलेल्या कामात नजरचुकीने अनेक अडचणी निर्माण होतात. गैरसजुती इतर व्यवहारातून गैरसमज होतात. या अमावास्येचे पूजन व लक्ष्मीस्तोत्र वाचन अतिशय लाभदायक ठरेल. अंधश्रद्धा झुगारून प्रयत्न केल्यास वरील सर्व अनिष्ट बाबींपासून होणारे नुकसान टळेल.


मिथुन

विवाहातील विघ्ने, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव, वैवाहिक समस्या, शत्रुपीडा, रहाती वास्तू या संदर्भात त्रस्त असाल. मोठी जबाबदारी पडली असेल, कुणाकडून धमक्मया वगैरे येत असतील तर या दीप अमावास्येला जास्तीत जास्त वेळा लक्ष्मीस्तोत्र वाचा. दीपपूजन करा. काहीतरी मार्ग निश्चित मिळेल.


कर्क

गुप्तशत्रुत्व, नको ती श्रीमंती, व्यसने, राग, द्वेष, गैरसमज शत्रुत्व, रहात्या जागेची समस्या, आरोग्याच्या तक्रारी नातेवाईकांकडून होणारे त्रास. मानसिक अस्वास्थ्य, कुणी निष्कारण बदनाम करीत असेल तर आषाढी अमावास्येला लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र वाचा आशादायक मार्ग दिसू लागेल.


सिंह

विश्वासाने दिलेले पैसे अडकले असतील. लग्नाचे वचन देऊन फसवणूक झाली असेल, एखाद्याला मदत केला असाल पण ती व्यक्ती कपटाने वागत असेल, धार्मिक कामात फसवणूक झालेली असेल. त्यातून त्रास वाढलेले असतील तर या अमावास्येला दीपपूजन व लक्ष्मीपूजन करून पहा. सर्व अडचणी कमी होतील.


कन्या

एखादे काम होण्याच्या आशेने कुणाकडे मोठय़ा प्रमाणात पैसे अडकले असतील, कुणी बदनाम करीत असेल, तुमच्याविरुद्ध अफवा पसरवीत असतील, आर्थिक अडचणी, पितरांचा त्रास असेल तर येत्या अमावास्येला लक्ष्मीस्तोत्र वाचावे. सर्व प्रकारच्या कामात मोठे यश मिळवाल. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील.


तुळ

आषाढी अमावास्या वास्तू व आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभदायक ठरेल. कोणत्याही मार्गाने धनलाभ होऊ शकतील. नवी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. रहात्या जागेसंदर्भात काही समस्या असतील. घराण्यात पूर्वजांचे दोष असतील, इस्टेट दुसऱयांच्या हाती गेलेली असेल तर दीप अमावास्येला दिव्याचे शास्त्राsक्त पूजन करून लक्ष्मी पूजन करा. काही तरी मार्ग निघेल.


वृश्चिक

दिव्याची वैशाखी अमावास्या भाग्यस्थानी होत आहे. काही दोष अथवा साडेसातीच्या प्रभावाने अडलेली कामे यापुढे होऊ लागतील. घरात मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. हे सारे या अमावास्येला महत्त्वाच्या कार्याचा संकल्प  करून श्वास शुद्ध रीतीने दीप व लक्ष्मी पूजन करा. भाग्य उजळेल.


धनु

दिवशी अमावास्या आरोग्याच्या तक्रारी व धनलाभातील अडथळे दूर करील. जीवावरची संकटे आली असतील तर त्यातून सुटका करील. या अमावास्येचे दीपपूजन व लक्ष्मीपूजन तुम्हाला अनेक बाबतीत शुभ फलदायी झालेले दिसून येईल. शत्रू थंड पडतील. आर्थिक व्यवहारात यश मिळू लागेल.


मकर

सप्तमात होणारी दीप अमावास्या विवाहासह सर्वच बाबतीत अतिशय चांगली आहे. धनलाभ, मित्रांचे सहकार्य, वास्तू संदर्भातील अडलेल्या कामात यश मिळणे, सांसारिक जीवनातील  अडचणी दूर होणे, वाहन संदर्भातील त्रास कमी होणे असे अनुभव येतील. वेळात ववेळ काढून या अमावास्येचे दीप पूजन जरुर करा.


कुंभ

षडाष्टकात होणारी दीप अमावास्या अनेक संकटातून मार्ग दाखवील. आरोग्याच्या तक्रारी, शत्रुत्व, आर्थिक नुकसान, स्पर्धा व ईर्षा यामुळे नुकसान व बदनामी, नोकरी व्यवसायात अडचणी, येत असतील तर येत्या आषाढी अमावास्येची पर्वणी साधून दीप पूजन व लक्ष्मी पूजन करा. अतिशय चांगले अनुभव येतील व सुधारणा होतील. नोकरीसाठी प्रयत्न केलेले असतील तर यश  मिळू शकेल.


मीन

माता पित्याशी असलेले मतभेद, मुलाबाळांच्या तक्रारी, शिक्षणातील अडथळे, विवाहात विघ्ने, संतती होण्यात पूर्वजांचे दोष आडवे येत असतील तर येत्या आषाढी अमावास्येला शास्त्राsक्त दीपपूजन करून दिव्याचा मंत्र म्हणून लक्ष्मी पूजन करा. प्रति÷sला धोका पोचलेला असेल तर त्यातून सुटका होईल.

Related posts: