|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » विजय मल्ल्या भारतात लवकरच ?

विजय मल्ल्या भारतात लवकरच ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातील विविध बँकांचे कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचालनालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्ल्यावरील गुह्यांचे आरोपपत्र दाखल करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या दोन सदस्यीय पथकामध्ये एक सहसंचालक दर्जाचा कायदा सल्लागार आहे. हे पथक सोमवारी लंडनला जाण्यासाठी रवाना झाले. काही दिवस लंडनमध्ये थांबून ते मल्ल्यावरील आरोपपत्र दाखल करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करुन गुरुवारी परतणार असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱयांनी दिली.

दरम्यान, मल्ल्याविरोधात 5 हजार 500 पानांचे आरोपपत्र आणि इतर काही कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सादर केली असून, मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी कायदा सल्लागार लंडनमधील ब्रिटिश लवादासोबत करार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: