|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत 100 वर्षापूर्वीच्या जुन्या वाडय़ाचे छत कोसळले

मिरजेत 100 वर्षापूर्वीच्या जुन्या वाडय़ाचे छत कोसळले 

प्रतिनिधी/ मिरज

शहरातील नदीवेस भागातील मोहन चिनुगडे यांच्या 100 वर्षापूर्वीच्या जुन्या वाडय़ाचे छत बुधवारी सकाळी कोसळून मातीच्या ढिगाऱयात सातजण अडकले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱयांनी मातीचा ढिगारा बाजूला करुन या सातही जणांचे प्राण वाचविले. यामध्ये चार महिलांसह एका बालकाचा समावेश आहे.

नदीवेस येथील माळी गल्लीत मोहन चिनुगडे यांचा सुमारे शंभर वर्षापूर्वी बांधलेला वाडा आहे. सदर वाडय़ाच्या भिंती, दुमजली माळवद हे पांढऱया मातीचे आहेत. जुनाट झाल्याने या भिंती आणि छत जीर्ण झाले होते. भिंती खिळखिळ्या झाल्या होत्या. तरीही या घरात चिनुगडे कुटुंबातील सात लोक रहात होते.

दोन दिवस शहर आणि परिसरात संततधार पाऊस पडत आहे. या पावसाने चिनुगडे यांच्या घराच्या भिंती आणि छतात पाणी शिरले होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास माळवदी छतातून काही मातीचा भाग खाली पडला होता. मात्र, त्याकडे चिनुगडे कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घराच्या मध्यभागातील छत आणि भिंतीचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे आतील खोलीत झोपलेले सातजण मातीच्या ढिगाऱयाआड सापडले. त्यांना बाहेर पडता येईना.

दरम्यान भिंत पडल्याचा मोठा आवाज झाल्याने आसपासचे लोक धावले. मात्र, घरात मातीचा ढिगारा असल्याने आतील लोकांना बाहेर कसे काढायचे? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर अग्निशमन दलाला बोलाविले. अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा आणि एक रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन अधिकारी शिवाजी दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणी कांबळे, सचिन जगताप, विजय कांबळे, राजेंद्र कदम, विक्रम घाडगे, सदाशिव चव्हाण, अमोल गडदे, प्रसाद माने, रोहित निकम, रोहित घोरपडे, तानाजी पाटील या कर्मचाऱयांनी प्रसंगावधान राखत युध्दपातळीवर मधल्या खोलीत पडलेला भलामोठा मातीचा ढिगारा बाजूला केला.

आतमध्ये असणाऱया पारुबाई चिनुगडे (वय 85), रत्ना चिनुगडे (35) विद्याश्री चिनुगडे (50), सुरेखा चिनुगडे (30) या महिलांसह सिध्दांत चिनुगडे या 11 वर्षीय बालकाला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी बाहेर काढले. अग्निशमनच्या कर्मचाऱयांनी दाखविलेल्या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले. या दुर्घटनेची मा†िहती कळताच उपायुक्त सौ. स्मृती पाटील, स्थायी समिती सभापती संगिता हारगे यांनी सदर ठिकाणी पाहणी करुन पाहणी करुन चिनुगडे कुटुंबियांना धीर दिला.

 

Related posts: