|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाद्वार रोड-गुडस्शेड रोड येथे घरांमध्ये शिरले पाणी

महाद्वार रोड-गुडस्शेड रोड येथे घरांमध्ये शिरले पाणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱया पावसाचा जोर मंगळवारी वाढल्याने दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परिणामी शहरातील नाले, गटारी भरून वाहू लागले आहेत. यामुळे विविध ठिकाणी गटारीतील सांडपाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची झोप उडाली. महाद्वार रोडसह शहरातील विविध परिसरातील नाले-गटारी तुंबून वाहत होते. तर गटारी तुंबून सांडपाणी घरात शिरल्याने रात्री उशिरापर्यंत घरातील पाणी उपसा करण्यासाठी धावपळ करावी लागली.

शहरातील नाल्यांचे पाणी घरांमध्ये घुसू नये, याची दक्षता महापालिकेने घेतली असल्याने अद्याप तरी सांडपाण्याचा त्रास नाला काठावरील रहिवाशांना झाला नाही. मात्र मागील वषी अचानक झालेल्या पावसामुळे मध्यरात्री पावसाचे पाणी वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याची धास्ती रहिवाशांना लागली असल्याने मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नागरिकांची झोपच उडाली होती. मात्र पावसामुळे गजानन महाराजनगर, महाद्वार रोड आणि गुडस्शेड रोड येथील घरांमध्ये गटारी तुंबून सांडपाणी शिरल्याची बाब निदर्शनास आली. तक्रारीची दखल घेवून बुधवारी सकाळी महापालिकेच्या अभियंत्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.

मागील वषी झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी नाल्यांमध्ये व गटारींमध्ये कचरा तुंबून सांडपाणी घरांमध्ये घुसले होते. तसेच कपिलेश्वर कॉलनी, मराठा कॉलनी, गुडस्शेड रोड, समर्थनगर, कॉंग्रेस रोड, शास्त्राrनगर परिसरात पावसाचे पाणी साचून राहिले होते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. यामुळे ही समस्या निर्माण होऊ नये, याकरिता महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

कपिलेश्वर कॉलनी येथील नाला स्वच्छ करण्यासह शिवाजी उद्यान, गोवावेस आणि शास्त्राrनगर परिसरातील नाल्यांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यामुळे सध्या तरी पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसला नाही. पण मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे महाद्वार रोड चौथा क्रॉस येथे पाण्याचा निचरा झाला नसल्याने सांडपाणी साचून शिवाजी दोरगुडे यांच्या घरात पाणी शिरले.

 

Related posts: