|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कौटुंबिक कलहातून चुलत भावाचा खून

कौटुंबिक कलहातून चुलत भावाचा खून 

तेवरहटी येथील घटना : कुऱहाडीने केला हल्ला : जोरदार वारांमुळे जागीच गतप्राण

वार्ताहर/ अथणी

कौटुंबिक कलहातून चुलत भावाचा कुऱहाडीचे घाव घालून खून केल्याची घटना तेवरहटी (ता. अथणी) येथे मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. आण्णाप्पा नेमाण्णा चिप्परगी (35) असे मृताचे नाव आहे. तर भिमू चिप्परगी
(37) असे खून करून पलायन केलेल्याचे नाव आहे.

घटनेविषयी अधिक माहिती अशी, मृत अण्णाप्पा व संशयित भिमू हे गुजरातमधील एका ग्लास कंपनीत कामाला होते. तेथील काम भिमूने सोडल्याने तो गावीच राहत होता. काम सोडल्याचा राग भिमूच्या मनात होता. मंगळवारी दुपारी आण्णाप्पा व त्याची पत्नी लक्ष्मी हे दोघे बुधवारी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तेवरहटीला दुचाकीवरून आले होते. त्यावेळी त्यांना भिमूने अडवले. त्यानंतर आण्णाप्पावर कुऱहाडीने हल्ला चढविला. ही घटना पाहून लक्ष्मीने तेथून पलायन केले. त्यामुळे ती बचावली आहे. भिमूने अण्णाप्पावर जोरदार केलेल्या वारांमुळे तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच सीपीआय एच. शेखराप्पा यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्या दरम्यान, आरोपी भिमूने घटनास्थळावरुन पलायन केले होते. आरोपीविरोधात अथणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.